भुसावळात स्टार ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर
भुसावळ- तार ऑफिस रस्त्यावरील स्टार ग्रुपतर्फे भुसावळ रक्तपेढीच्या सहकार्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.रक्तदात्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
रक्तदान श्रेष्ठदान -आमदार संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान असून जास्तीत जास्त नागरीकांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. आपल्या रक्तदानामुळे कुणाला जीवनदान मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्टार ग्रुपच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, डॉ.तुषार पाटील, डॉ.इमरान खान, अनिल जैन, राजेश काबरा, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी..सुरळकर, प्रा.सुनील नेवे, नारायण रणधीर, भरत गायकवाड, आर.आर.निकम, दिनेश नायर, शेखर गौड, रोहन परदेशी, पिंटू राजपूत, जाकिर कच्छी, श्यामू परदेशी, मुकेश सिंह, मुन्सफ अली, जे.के.टेकवाणी, कुंदन कश्यप, अनिल डोरा, धीरज चौरसिया, प्रतीक गौड, दिनेश परदेशी, कमलेश खताळ, निखील देहाडे, गणेश गवळे, प्रभाकर पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, धीरज वर्र्हाळे, तुषार पाटील, कुणाल देहाडे, निलेश मोरे, मनोज साळुंके, बंडूभाऊ, राहुल पाटील आदी उपस्थित होते.