बसमधून पोलिस पत्नीचे दागिने लांबवले
धुळे : लग्नाला निघालेल्या पोलिस पत्नीचे दागिने भामट्याची लांबवल्याची घटना धुळे बसस्थानकावर घडली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले विजय पाटील यांच्या चुलत भावाच्या लग्नासाठी ते कुटुंबासह अमळनेर येथे निघाले असता चोरट्यांनी पर्समधील सुमारे 71 हजारांचे दागिने लांबवले. या प्रकरणी भाग्यश्री पाटील यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

