भुसावळ विधानसभेची जागा काँग्रेसलाच सुटणार


जिल्हाध्यक्ष मुन्वर खान यांना विश्‍वास : संजय ब्राह्मणेंनाच उमेदवारी

भुसावळ : भुसावळ विधानसभेची जागा काँग्रेसलाच सुटणार असल्याचा दावा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मुन्वर खान यांनी केला आहे. ते म्हणाले की, भुसावळ विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी देण्याचा शब्द वरीष्ठ पातळीवरून मिळाला असून कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सतीश घुले हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे वक्तव्य शहरातील एका मंडळाच्या आरतीप्रसंगी केले होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली असून जागा नेमकी कुणाला सुटते ? याकडे राजकीय समीक्षकांचे लक्ष लागले आहे.

जागा काँग्रेसलाच -मुन्वर खान
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्‍वास दुणावला आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार, नवाब मलिक, प्रा.जोगेंद्र कवाडे, आमदार के.सी.पाडवी आदी पक्षश्रेष्ठींची इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी नुकतीच बैठक घेतली त्यावेळी भुसावळची जागा काँग्रेसलाच सुटेल, असा विश्‍वास पक्षश्रेष्ठींनी दिला असल्याचा दावाही मुन्वर खान यांनी केला आहे.


कॉपी करू नका.