शेंदुर्णीच्या 12 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू
शेंदुर्णी : रोटवद-कासमपुरा रस्तावरील नाल्यात पुराच्या पाण्यात रीक्षा वाहून गेल्याने शेंदुर्णी येथील दिनेश प्रवीण गुजर (12) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. शेंदुर्णी होळी मैदान भागातील सार्वजनिक गणेश मंडळ भंडार्याचा कार्यक्रम असल्याने केळीची पानं घेण्यासाठी दापोरा येथे शेंदुर्णीचे युवक गेले. ते रीक्षात जात असताना मामाच्या गावाला जाण्यासाठी दिनेश गुजरही रीक्षात गेल्यानंतर दापोरा येथून केळी व केळीचे पान घेऊन येत असताना रोटवद- कासमपुरा नाल्यातील पाण्याचा रात्री अंदाज न आल्याने रीक्षा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.