काँग्रेसचा 60 वर्षांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवा
विनायकराव देशमुख : फैजपूरला सेक्टर इन्चार्ज पदाधिकार्यांचे शिबिर
फैजपूर- निवडून येण्यासाठी सत्ताधारी कुठल्याही स्थरावर उतरले आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेसने 60 वर्षात केलेल्या कार्याचा लेखा-जोखा जनतेपर्यंत पोहचवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व जळगाव जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी येथे केले. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित यावल-रावेर विधानसभाचे सेक्टर इनचार्ज शिबिरात ते बोलत होते.
काँग्रेसने देशाला सक्षम केले
विनायकराव देशमुख म्हणाले की, 70 वर्षात काँग्रेस काय केले ? असा प्रश्न केला जातो मात्र त्याचे आपल्याला उत्तर देता येत नाही. काँग्रेसने या देशाला सक्षम देश तयार करून दिला आहे. स्वातंत्र्यानंतर विचीत्र होणारी ही निवडणूक आहे. काँग्रेसने 60 वर्षात काय केलेल्या कार्याचा याचा लेखा-जोखा बूथनिहाय कशा पद्धतीने जनतेपर्यंत पोहचावायचा आहे व हे मतदान वाढवण्यासाठी कॉर्डीनेटरांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे ते म्हणाले.
प्रोजेक्टरवर दाखवला लेखा-जोखा
काँग्रेसने 60 वर्षात सक्षम देश तयार करून दिला मात्र आताच्या भाजपा सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेत भयानक स्थिती निर्माण झाल्याने शेअर बाजार कोसळत असून अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे, इंड्रस्टीरीज बंद पडत आहे, बंद पडलेल्या कार आदींबाबतचा लेखा-जोखा यावेळी सेक्टर इनचार्ज यांना शिबिरात प्रोजेक्टरवर दाखविण्यात आला.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी यावल तथा जिल्हा परीषद गटनेता प्रभाकर सोनवणे, कृ.उ.बा सभापती पी.सी.पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, पंचायत समितीचे मामजी सभापती लिलाधर चौधरी, ईस्माईल तडवी, रावेर तालुका काँग्रेसध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चंद्रकला इंगळे यांच्यासह रावेर विधानसभा क्षेत्रातील सेक्टर इनचार्ज व पदाधिकारी, फ्रेंटलचे अध्यक्ष व पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.