लग्न मोडल्याने तरुणीने केले फिनाईल प्राशन
शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
शिरपूर : तालुक्यातील एका तरुणीचे व्हाट्सएपवरून फोटो व्हायरल केल्याने तिचे लग्न मोडले व या मनस्तापातून तरुणीने फिनाईल प्राशन केल्याची घटना 11 जानेवारी रोजी एका गावात घडली. तरुणीला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गावातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका गावातील 19 वर्षीय तरुणीने शहरात पोलिसात दिलेल्या जबाबनुसार तिचा विवाह जुडला होता.विवाह जुडल्यानंतर गावातील संशयीत आरोपी प्रकाश मोहिते याने तरुणीचे फोटो व्हाट्सएपवर व्हायरल केले त्यामुळे तिचे जुडलेला विवाह मोडला.जुडलेला विवाह मोडल्याच्या मनस्तापाने तरुणीने घरात फिनाईलचे प्राशन केले त्यामुळे तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीने पोलिसांत दिलेल्या जबाबावरून शहर पोलिसात प्रकाश मोहिते विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पावरा करीत आहेत.

