नांद्रा खुर्द येथे महिला उमेदवाराचा मृत्यू


प्रभाग क्रमांक 1 ची ग्रा.पं निवडणूक प्रक्रिया स्थगीत

जळगाव : तालुक्यातील नांद्रा खुर्द-खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीसाठी प्रभाग 1 मधून निवडणूक लढवित असलेल्या वैजंताबाई पांडुरंग पाटील (65) यांचा मंगळवार, 5 जानेवारी रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याने ग्रामपंचायत तरतुदीनुसार नांद्रा खापरखेडा त्या प्रभागापूरती निवडणूक प्रकिया रद्द करण्यात येवून उर्वरित मतदान प्रकियेची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार नामदेव पाटील यांनी दिली. याबाबतचे आदेश 12 जानेवारी रोजी पारीत झाले आहेत.

हृदयविकाराने उमेदवाराचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील नांद्रा खु.- खापरखेडा गृप ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रभाग 1 मधून वैजंताबाई पाडुरंग पाटील यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून नामांकन अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रकियेदरम्यान 5 जानेवारी रोजी उमेदवार वैजंताबाई यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवार वैजंताबाई यांचा मृत्यू झाल्याने प्रभाग एक पुरताच निवडणूक प्रकिया रद्द करण्याचे आदेश जळगाव तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नामेदव पाटील यांनी आज 12 जानेवारी रोजी पारित केले आहेत. नांद्रा खु.- खापरखेडा गृप ग्रामपंचायतमध्ये प्रभाग 1 वगळता उर्वरीत प्रभागासाठी मतदान प्रकियेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.


झोपेतच झाला हृदयविकाराने मृत्यू
4 जानेवारी रोजी वैजंताबाई यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना धामगणाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. येथून परतल्यानंतर त्यांची प्रकृती ठिक होती. 5 रोजी गटारीच्या स्वच्छतेसह इतर कामे केली. यानंतर दुपारी झोपले. सायंकाळ होवूनही उठत नसल्याने त्यांची सूनबाई मनिषा ह्या त्यांना उठविण्यास गेल्या असता वैजंताबाई या उठल्या नाही. यानंतर डॉक्टरांना बोलाविण्यात आले. डॉ प्रदीप भालेराव यांनी त्यांची तपासणी करुन वैजंताबाई यांचा झोपेतच हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचे सांगितले. वैजंताबाई यांच्या पश्चात मुलगा प्रमोद पाटील, मुलगी सोनाली, सून मनिषा असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !