चार दिवसांत मका खरेदी केंद्र सुरू करण्याच्या आश्‍वासनाने उपोषणाची सांगता


बोदवड : शहरातील मका खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात शेतकरी संघटनेने उपोषण छेडले होते. शासनाने नोंदणीकृत शेतकर्‍यांकडील मक्याची खरेदी करावी वाव बाजार भावातील फरक द्यावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी केली होती. बुधवारी नायब तहसीलदार पुष्कर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. प्रसंगी बोदवड खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक तुकाराम राणे उपस्थित होते. जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर चार दिवसात मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

भर उन्हात शेतकर्‍यांचे उपोषण
शेतकर्‍यांनी कोणताही मंडप न टाकता भर उन्हात उपोषण छेडले होते. बोदवड तालुक्यातील कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सहा हजार सातशे हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आली होती शिवाय अंदाजे उत्पन्न 24 हजार क्विंट्टल पेक्षा जास्त आले होते. 850 शेतकर्‍यांनी शासनाकडे नोंदणी केली असलीतरी प्रत्यक्षात केवळ 25 शेतकर्‍यांचा मका खरेदी करण्यात आला होता. या उपोषणात पुरुषोत्तम पाटील, नाना पाटील, प्रवीण मोरे, दीपक बडगुजर, दगडु शेळके, संतोष पाटील, आनंद पाटील, हेमंत चौधरी, लोकेश बडगुजर, रतनसिंग पाटील, सुवर्णसिंग हजारी, राहुल वाघ सहभागी झाले होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !