मतदान करणार्‍यांना नेत्र तपासणीच्या फी मध्ये 50 टक्के सवलत


भुसावळ :  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील हे मतदार जनजागृती अभियान रावबणार आहेत. मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्रतपासणी फी मध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान केल्यानंतर हे अभियान 18 ते 26 जानेवारी वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास सदर सवलतीचा फायदा घेता येणार आहे.

सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक
प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाही बळकट करणे होय. मतदान हा लोकशाहीचा सर्वोत्तम उत्सव आहे. प्रत्येक नागरीकाने मतदान करण्यासाठी प्रेरीत व्हावे यासाठी 18 ते 26 जानेवारी या काळात नेत्र तपासणी शुल्कात 50 टक्के सूट मिळणार आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.नितु पाटील यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !