सावदा पालिका इमारतीवर बसणार सोलर पॅनल


नगरपालिका विजेच्या बाबतीत होणार स्वयंपूर्ण

सावदा : सावदा पालिकेच्या इमारतीवर लवकरच सोलर पॅनल बसवले जात असून या माध्यमातून पालिका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार दरवर्षी येणार्‍या लाखो रुपयांचे वीज बिलाचीदेखील बचत होणार आहे. सोलर पॅनलबाबत पालिका सभेत ठराव मंजूर करण्यात आला होता शिवाय याबाबत निविदा काढण्यात येऊन एका संस्थेस हे काम देण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे काम करण्यात येत आहे. लवकरच या कमास सुरवात होणार आहे.

लाखोंच्या वीज बिलात होणार बचत
पालिकेच्या इमारतीवर हे ग्रीड कनेक्टर सोलर बसविण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर संपूर्ण पालिकेचा असणारा वीजपुरवठा सोलर पॅनलवरून होईल यामुळे पालिकेची वर्षाकाठी लाखो रुपयांची वीज बचत होणार आहे.


अशी होणार वीज बिल बचत
पालिकेस महिन्याकाठी नवीन इमारतीचे बिल 12 ते 13 हजार रुपये इतके येते. वर्षभरात एक लाख 50 हजारांचे वीज बिल पालिका महावितरण कंपनीकडे भरते मात्र ही सोलर पॅनल यंत्रणा कार्यन्वित झाल्यावर वर्षाकाठी पालिकेची सुमारे दीड लाख रुपयांची वीज बिल बचत होणार आहे. सोलर पॅनल बसवून स्व:त वीज निर्मिती करणारी बहुधा सावदा ही जिल्ह्यातील पहिलीच पालिका ठरणार असल्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !