देशभरात निधी समर्पण अभियान


जिल्हाभरात विविध उपक्रम; रॅली, सभा, भक्तीफेरीचे आयोजन

भुसावळ : अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर लवकरच राममंदीराचे भव्य असे निर्माण होणार आहे. त्या निर्माण कार्यासाठी हात भार लागावा यासाठी विश्‍व हिंदू परीषदेतर्फे संपूर्ण देशभरात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान श्रीराम मंदीर समर्पन निधी अभियान राबविण्यात येणार आहे. भुसावळ जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध स्तरावर बैठका घेण्यात येत आहे. संघकार्याच्या दृष्टीने भुसावळ जिल्हा भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, शेंदूर्णी, जामनेर असे एकूण आठ तालुके (प्रखंड) आहेत. अभियानासाठी प्रत्येक तालुका स्थरावर समितींची स्थापन करण्यात आली आहे. अभियान राबविण्यासाठी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संत महंताची समिती स्थापन करण्यात आली आहे. यातील संत महंत महिन्याभरात आठही प्रखंडात आजपासून राम मंदिर निधी समर्पण अभियानासाठी विविध व्याख्याने, किर्तने करणार आहे. आठही प्रखंडात तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हाभरात रॅली, रामधून दिंडी अश्या प्रकारच्या विविध उपक्रमांत जनसंपर्क करुन निधी जमा करण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !