तीन लाखांचा दारू साठा जप्त
वाहनासह चार लाख 62 हजाराचा मुद्देमाल जप्त
शिरपूर : गोपनीय माहितीच्या आधारे थाळनेर पोलिसांनी पिंप्रीजवळ 14 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका चारचाकीतून तीन लाख लाख 12 हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला. तालुक्यात 28 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून याचं पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्ती वाढविली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनलगत पिंप्री फाट्याजवळून एका कारमधून अवैध दारुसाठ्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय सचिन साळुंखे यांना मिळल्यावरून सापळा रचण्यात आला. चारचाकी क्रमांक जी.जे.05 सी.एफ.4470 ची तपासणी केली असता त्यात बॉम्बे व्हिस्कीचे एकूण 50 बॉक्स आढळले. तीन लाख 12 हजार रुपये किमतीचे दारूचे एकूण 50 बॉक्स तसेच एक चार चाकी वाहन किंमत अंदाजे 1 लाख 50 हजार असा एकूण 4 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन साळुंखे, पीएसआय नवनाथ रसाळ,सिराज खाटीक, प्रकाश मालचे, उन्मेष आळंदे, नरेंद्र पवार आदींच्या पथकाने केली.


