माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे ईडी कार्यालयात हजेरी


भोसरी भूखंड प्रकरणी माजी महसूलमंत्र्यांना ईडीने बजावली होती नोटीस

मुंबई : भोसरी भूखंड प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती मात्र खडसे यांना कोरोनासृदश आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना 14 दिवसानंतर चौकशीस बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्यानुसार, शुक्रवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता खडसे हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याची भूमिका यापूर्वीच खडसे यांनी जाहीर केली आहे. सर्व कागदपत्रे सादर करणार असून ईडीला सहकार्य करणार असल्याचे खडसे म्हणाले.

कोरोनासदृश लक्षणांमुळे लांबली चौकशी
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यांना त्यांना 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर रहावे, असे नोटीसीत नमूद होते मात्र खडसे यांना कोरोनासदृश आजाराची लक्षणे जाणवल्याने 14 दिवसांनी खडसे हे ईडीला सामोरे जाणार असल्याचे पत्र त्यांनी दिल्यानंतर शुक्रवारी खडसे ईडी कार्यालयात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !