नोकरीच्या मागे न धावता उद्योग धंद्यांकडे वळा
आमदार संजय सावकारे : भुसावळात लेवा पाटीदार समाजीतील गुणवंतांचा सत्कार
भुसावळ- नोकरीच्या मागे न धावता गुणवंतांनी आता उद्योग-धंद्यांकडे वळणे गरजेचे आहे. आई-वडील पाल्यांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट व मेहनत घेतात त्यामुळे मुलांनीही या कष्टाची जाण ठेवणे गरजेचे आहे. लेवा समाज हा उच्च शिक्षीत व प्रगत असून समाजातील विद्यार्थ्यांनी केवळ वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासोबत इतर स्पर्धा परीक्षांमध्येही सहभाग घेणे गरजेचे असल्याचे आमदार संजय सावकारे येथे म्हणाले. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शहरातील खाचणे हॉल येथे करण्यात आला. याप्रसंगी आमदार बोलत होते. गुणगौरव समारंभात 280 गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कुल बॅग, फाईल, राईटिंग पॅड, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, नामदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार नीळकंठ फालक, मसाका चेअरमन शरद महाजन, अॅड.प्रकाश पाटील, आर.जी.चौधरी, सुधीर पाटील, सुहास चौधरी, राजेश चौधरी, परीक्षीत बर्हाटे, अॅड.बोधराज चौधरी, दीपक धांडे, प्रदीप भोळे आदी उपस्थित होते.