यावलमधील विस्तारीत भागातील नागरीकांची पालिकेवर धडक


यावल : शहरातील आयेशा नगरासह विस्तारीत भागातील समस्या सोडण्या करीता ग्रामस्थांनी बुधवारी पालिकेवर धडक दिली. प्रशासनाकडे तेथील वास्तव चित्र मांडत समस्या सोडवण्याची मागणी केली. विस्तारीत भागात या पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा होण्याकामी गटारी नसल्याने सर्वत्र चिखल व पाण्याचे डबके साचले आहेत व त्यातुन डांसाची उत्पत्ती वाढून साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली.  शहरातील भुसावळ रस्त्याला लागुन आयेशा नगर, चाँदनगर, पांडुरंग सराफ नगर, गंगा नगरातील मागील भाग अशा विविध भागांमध्ये पालिकेकडून रस्ते व गटारींचे काम झाले नाही तर या विस्तारीत वस्त्यांमध्ये सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यातचं आता पावसाळा सुरू असून पावसाचे पाणी रस्त्यावर येवून चिखल झाला आहे. त्यात नागरीकांना शहरात येण्या करीता तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्याकरीता चिखल तुडवत यावे लागते. ठिक-ठिकाणी या विस्तारीत भागात पाण्याचे डबके साचलल्याने डासांची उत्पत्ती होत आहेे. बुधवारी या भागातील शेकडोच्या संख्येत नागरीक एकत्र होवुन त्यांनी सकाळी 11 वाजता पालिका गाठली. या भागातील वास्तवता दाखवणार्‍या छायाचित्रांसह दहा पानांचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी बबन तडवी व नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी फारूख शेख, अशपाक शाह, रईस खान, कौसर खान, मो. अशपाक, शेख अकरम, तौसिफ खान, सलीम पटेल, सैय्यद माजीद अली, सलीम खान, असलम खान, जावेद पटेल, आमीर खान, कदीर पटेल, शाहीद पटेल, आरीफ शेख, परवेज पटेल, शेख खलील सह शेकडो नागरीकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, नगराध्यक्ष सुरेखा कोळी व नगरसेवक अतुल पाटील, शेख असलम, डॉ.कुंदन फेगडे यांनी या नागरीकांच्या समस्या ऐकून घेत या भागातील काही कामे 14 व्या वित्त आयोगातुन प्रस्तावीत असून लवकरचं या भागात गटारी व रस्ते होतीत, असे आश्‍वासन दिल्यानंतर नागरीक माघारी परतले.


कॉपी करू नका.