विधानसभा निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केल्यास शंभर कोटी खर्चाची होती ऑफर
राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
सातारा : विधानसभा निवडणुकीत शंभर कोटी रुपये खर्च करण्याची ऑफर भाजपाकडून होती मात्र त्यासाठी भाजपकडून प्रवेशाची अट टाकण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘मला भाजपकडून प्रवेश करण्याची आणि विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च करण्याची ऑफर देण्यात आली होती’ असे विधान त्यांनी केले आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा विधान परिषदेवर घेण्यात आले.
