किनगावात किराणा दुकान फोडले : पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लांबवला


यावल- तालुक्यातील किनगाव येथील किराणा दुकान फोडत चोरल्यांनी पावणे दोन लाखांचे पान मसाल्याचे साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी मुुद्देमालासह दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआरदेखील लांबवला तर गावातून एक दुचाकीदेखील चोरीस गेल्याचे सांगण्यात आले. किनगाव येथील मुख्य चौकातील अजय किराणा दुकानातून किराणासह पान मसाल्याचे साहित्य होलसेल दरात विक्री केले जाते. मंगळवारी रात्री मालक अजय नीळकंठ पाटील हे दुकान बंद करून घरी गेले. बुधवारी सकाळी 7.30 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यावर चोरी उघड झाली. मागील बाजूने दुकान फोडल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी दुकानातील डीव्हीआर पहिला मात्र हा डीव्हीआर देखील चोरट्यांनी लांबवल्याचे समोर आले. चोरट्यांनी या दुकानातून बिडी, सिगारेट, तंबाखू असे सुमारे पावणे दोन लाखांचे साहित्य लांबवल्याचे समोर आले. अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, श्‍वानपथकाने अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्ग असा माग काढल्याने चोरटे राज्य मार्गाने पसार झाल्याचा अंदाज आहे.


कॉपी करू नका.