भुसावळातील भालेराव दांपत्य राष्ट्रीय नृत्यविभूषण पुरस्काराने सन्मानीत


भुसावळ- शहरातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीचे संचालक रमाकांत भालेराव तसेच नृत्त्यशिक्षीका चारु भालेराव यांना राष्ट्रीय नृत्यविभूषण पुरस्कार तर नुपूर भालेराव हिस राष्ट्रीय नृत्यश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.कटक (ओडिसा) येथे 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन उत्कल युवा सांस्कृतिक संघोतर्फे करण्यात आले. कटक येथील सरला भवन येथे झालेल्या कार्यक्रमात रमाकांत भालेराव व चारु भालेराव यांनी अर्धनारीनटेश्वर स्तुती कथक नृत्यातून सादर केली. नुपूर भालेराव हिने कथक मधील तरानणा प्रकार सादर केला. या पुरस्काराचे स्वरुपात सन्मानपत्र, शाल ,स्मृतीतचिन्ह व पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ईराण येथील कलावंत उपस्थित होते. राष्ट्रीय स्पर्धेत हिमांशु जावळे याने कथक मधील तोडे, तुकडे, गतप्रकार सादर करत उत्कृष्ट सादरीकरण पारितोषिक प्राप्त केले. त्याला स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.


कॉपी करू नका.