मुक्ताईनगरातील तीन प्रभागात पोलवर वीज तारांऐवजी आता एबी केबल


मुक्ताईनगर : शहरातील तीन प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने डीपी डीसीएससी योजनेंतर्गत इलेक्ट्रिक पोलवरील तारा बदलून एबी केबल मंजूर झाली आहे. लवकरच तिघेही प्रभागात एबी केबलचे टाकण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मनोज चौधरी यांनी दिली. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे मुक्ताईनगर शहरातून डीपीडीसी योजनेंतर्गत शहरातील इलेक्ट्रिक पोलवरील अ‍ॅल्युमिनियमच्या विद्युत वाहक तारा बदलून एबी केबल मंजुरीसाठी त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांकडून प्रभागात रहिवासी असलेल्या मागासवर्गीय एससी नागरीकांच्या रहिवासाचे पुरावे म्हणून मतदार यादीतील नावे व जातीचा पुरावा असलेल्या दाखले मागविले होते. याबाबत तसे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.

तीन प्रभागातून प्रतिसाद
प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक मुकेश वानखेडे, प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका साधना ससाने तसेच प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक संतोष मराठे या केवळ तीन नगरसेवकांनी प्रतिसाद दिला व कार्यतत्परता दाखवत प्रभागातील अ‍ॅल्युमिनियमच्या तारा बदलण्यास संदर्भात वीज वितरण कंपनीच्या कागदपत्रांच्या मागणीला वेळोवेळी सहकार्य करीत प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे या तिघाही नगरसेवकांच्या वार्डात डीपीडी सीएससी योजनेंतर्गत इलेक्ट्रिक पोल वरील जुन्या अ‍ॅल्युमिनियमच्या तारा बदलून नवीन एबी केबल टाकण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रभागात होल्टेज कमी-जास्त होणे, विजेच्या धक्क्याचे अनुचित प्रकार तसेच वीज चोरी अशा प्रकारांना आळा बसणार आहे शिवाय ज्यांच्या घराजवळून इलेक्ट्रिक तारा गेल्या आहेत अशांसाठी परीसर सुरक्षित होणार आहे.


कॉपी करू नका.