आंदोलक शेतकर्यांनी लाल किल्ल्यावर फडकवला झेंडा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांकडून आंदोलन सुरू असतानाच मंगळवारी आंदोलक शेतकर्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन केले होते मात्र आज सकाळपासूनच या रॅलीला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आखून दिलेले मार्ग धुडकावत आंदोलक दिल्लीत शिरल्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला आहे. प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परीस्थिती निर्माण झाली आहे.
पंतप्रधान व राष्ट्रपती भवनाबाहेरील सुरक्षेत वाढ : इंटरनेट सेवा बंदचे आदेश

