डोक्यात लाकडा दांडा घालून वृद्धेचा खून
पिंपळगाव कमानी तांडा गावातील दुर्दैवी घटना
जामनेर- तालुक्यातील पिंपळगाव कमानी तांडा येथे किरकोळ कारणावरून वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू झाल्याची गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. शांताबाई मदन चव्हाण (60) असे मयताचे नाव आहे. संशयीत आरोपी भोजराज सावजी राठोडविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अंगणात बैलगाडी सोडण्याच्या कारणावरून शांताबाई मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात भांडण होवून वाद विकोपाला गेले. भोजराजने वृद्धेच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. अति रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.