12 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक


शिरपूर : तालुक्यातील कुरखळी शिवारात 12 एकर ऊस शॉटसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार, 29 जानेवारी रोजी दुपारी 1.30 ते दोन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत कुरखळी येथील अनिल तुळशीराम मोरे, गणपत शंकर मोरे, सुभाष शंकर मोरे, थॉमस अंबालाल राजपूत यांच्या शेतातील उसाला29 रोजी दु. 1. 30 वाजेच्या सुमारास शॉटसर्किट होऊन अचानक आग लागली. या आगीत अंदाजे 10 लाख किमतीचा 400 टन ऊसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

20 एकर ऊस वाचवण्यात यश
घटनेचे वृत्त कळताच कुरखळी व सावळदे येथील युवकांनी धाव घेत आग लागलेल्या शेताच्या आजूबाजूचा परीसरात ऊस तोड करीत आग आटोक्यात आणल्याने शेताच्या आजूबाजूचा तोडणीला आलेला अंदाजे 20 एकर ऊस वाचविण्यात यश आले आहे.घटनेची माहिती मिळताच तलाठी व वीज वितरण कंपनीचे वायरमन रज्जाक शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे निघून गेल्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. घटनास्थळी कुरखळी व सावळदे गावातील तरुण,स्थानिक शेतकरी,वायरमन रज्जाक शेख, पोलीस पाटील,यांच्या सह ऊस तोडणी मजूर उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !