एक हजार केळीची झाडे अज्ञाताने कापून केले नुकसान


15 दिवसात एकाच शेतात दुसर्‍यांदा हजारापेक्षा जास्तीची झाडे अज्ञाताकडून तोडण्यात आली

शिरपूर : तालुक्यातील तरडी येथील हिलाल गोपीचंद पाटील यांच्या शेतात केळी पिकाची 15 दिवसात दुसर्‍यांदा एक हजारापेक्षा जास्त झाडे अज्ञात व्यक्तीकडून तोडण्यात आल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. पाटील यांच्या शेतातोल तीन महिन्याची जवळपास एक हजार झाडे मागच्या पंधरा दिवसापूर्वी म्हणजे 12 जानेवारी रोजी अज्ञाताने कापून फेकून दिलेली होती. त्यानंतर पुन्हा त्याच शेतात पुन्हा गुरुवारी केळीची एक हजार पेक्षा जास्त केळीची झाडे अज्ञाताने कापून नुकसान केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.

संशयीतांवर कारवाईची अपेक्षा
शेतात पीक लावल्यानंतर काही महिन्यांनी कापून फेकले जाते.अशा या सातत्याने होणार्‍या नुकसानीने पाटील रडकुंडीला आहेत. या संदर्भात त्यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात अर्जही केला आहे मात्र संशयीतांवर कारवाई होण्याचे तर दूरच मात्र त्याने पंधरा दिवसांच्या अंतरातच दोन वेळा केळी कापून फेकून दिली आहे. पाटील यांच्या शेतात मागील पाच ते सात वर्षांपासून असे नुकसान केले जात आहे. मात्र अजूनही या अज्ञात माथेफिरूचा शोध लागलेला नाही. संशयीतांचा तात्काळ शोध घेऊन कारवाईची मागणी होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !