भुसावळात साईजीवन सुपर शॉपी व आमदार सावकारे ग्रुपतर्फे 12 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन


नगरसेवक पिंटू कोठारींचे दातृत्व : गणेश भक्तांसाठी 550 किलो खिचडीचा महाप्रसाद

भुसावळ : लाडक्या गणरायाला निरोप देताना भाविक पूजा-पत्रीचे साहित्यदेखील नदीपात्रात टाकत असल्याने होणारे जलप्रदूषण पाहता भुसावळातील साईजीवन सुपरशॉपी व आमदार संजय सावकारे ग्रुपतर्फे यावल नाक्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गुरुवारी दिवसभरात सुमारे 12 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन या माध्यमातून करण्यात आले तर घरगुती गणपती विसर्जनासाठी सहा पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्याने सुमारे 60 भाविकांनी आपापल्या घरातील श्रींचे मनोभावे त्यात विसर्जन केले. भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक पिंटू कोठारी यांनी श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश भक्तांसाठी 550 क्विंटल किलो खिचडीसह पाण्याचे वाटप करून पुन्हा एकदा आपल्या दातृत्वाचा परीचय दिला.

जलप्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार
आमदार संजय सावकारे ग्रुप व साईजीवन सुपर शॉपीच्या संयुक्त विद्यमाने यावल नाक्यावर गुरुवारी दिवसभर निर्माल्य संकलन करण्यात आले. या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत तब्बल 12 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन झाल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण रोखण्यास मदत झाली शिवाय घरघुती मूर्ती विसर्जनासाठी सहा टाक्या ठेवण्यात आल्या. या टाक्यांमध्ये सुमारे 60 भाविकांनी श्रींचे विसर्जन केले.

550 किलो खिचडीचे वाटप
नगरसेवक व साईजीवन सुपर शॉपीचे संचालक पिंटू कोठारी यांनी श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी तब्बल 550 किलो खिचडीचे वाटप केले शिवाय भाविकांसाठी थंडगार पाण्याची व्यवस्थाही केली. कोठारींच्या या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी हिंदू हौसिंग सोसायटी, आमदार संजय सावकारे गु्रप तसेच साईजीवनमधील कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- https://www.youtube.com/watch?v=NY79NKgpaCE


कॉपी करू नका.