22 वर्षीय युवती बेपत्ता


शिरपूर : तालुक्यातील विखरण येथील 22 वर्षीय युवती कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेल्याने आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
विखरण येथील रुपाली बाळू भील (22) ही युवती 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरात कोणाला काही एक न सांगता घरातून बाहेर गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने तिची आई सुनंदाबाई बाळू भील (47) यांनी शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली. तपास पोलिस नाईक डी.जी.ठाकरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !