अवैध बिअरच्या साठ्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त


शिरपूर : तालुक्यातील रोहीणी-खंबाळे रस्त्यावर नवापाडा गावालगत एका पिकअप वाहनावर गोपनीय माहीती वरून तालुका पोलिसांनी कारवाई करीत 87 हजार 480 रुपये किंमतीचा बिअर साठ्यासह पाच लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्यप्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमेवरून अवैध बिअर साठ्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस अभिषेक पाटील यांना मिळाल्यावरून पथकासह रोहिणी- खंबाळे रस्त्यावर नवापाडा गावालगत सापळा रचला.

पाच लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त
पीकअप (एम.एच.19 एस.6504) याचे वरील चालक पोलिसांना पाहताच पळाला तर वाहनाची तपासणी केली असता वाहनामागील सामान ठेवण्याचे जागी माऊंट 6000, सुपर स्ट्राँग बीअर ब्रँडचे 54 खोके त्यात 648 बाटल्या बिअर असा 87 हजार 480 रुपये किंमतीचा मद्यसाठा आढळला तसेच पाच लाख रुपये किंमतीचा महेंद्रा पीकअप जपत करण्यात आली. याप्रकरणी योगेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन मुंबई दारु बंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये सदर पिकअप वाहनाचे चालक व मालक यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अभिषेक पाटील, पोहेकॉ संजय देवरे, हेमंत पाटील, संजय जाधव, गोविंद कोळी, योगेश मोरे व गुन्हे शाखेचे नाईक अशोक पाटील व मयुर पाटील यांच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !