भुसावळ गणेशोत्सव स्पर्धेत सांस्कृतिक फाऊंडेशने पटकावला प्रथम क्रमांक


रोटरी रेल सिटीच्या प्रसन्न देव स्मृती स्पर्धा उत्साहात

भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे घेण्यात आलेल्या स्व.रो.प्रसन्न देव स्मृती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत सांस्कृतीक फाऊंडेशनने प्रथम क्रमांक पटकावला. विविध गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे पारीतोषिक वितरण रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक मंडळांचा उत्कृष्ट सामाजिक संदेश या गटात संस्कृती फाऊंडेशने प्रथम, शंभुराजे ग्रुपने व्दितीय व समता गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. शालेय गणेशोत्सवातील कल्पकता या गटात के.नारखेडे विद्यालयाने प्रथम तर महाराणा प्रताप विद्यालयाने व्दितीय क्रमांक पटकावला तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेत सचिन वाणी यांनी प्रथम, राजेंद्र पारोळेकर यांनी व्दितीय तर प्रदिप फिरके यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अमोदा येथील मुख्याध्यापक तथा कला शिक्षक संजीव बोठे व यावलचे संजय ताडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

विजेत्यांचा पारीतोषिक देवून गौरव
प्रभाकर हॉल मध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना रोख रक्कम व पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर तुरटीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणारे उद्योजक रामकृष्ण ढाके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. संजीव बोठे व संजय ताडेकर यांनी परीक्षणातील अनुभव कथन केले. रामकृष्ण ढाके यांनी तुरटीच्या गणपतीचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्व सांगितले. प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. तर रेल सिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. मकरंद चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रेल सिटीचे सदस्य मंडळांचे कार्यकर्ते, शिक्षक तसेच घरगुती स्पर्धेतील विजेते सहकुटुंब उपस्थित होते.


कॉपी करू नका.