गावठी कट्ट्यासह संशयीत धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई : दुचाकीही केली जपत
धुळे : शहरातील दसेरा मैदान परीसरातील आशीर्वाद कॉम्प्लेक्सजवळ एका संशयीत गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने असल्याची माहि ती धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर संशयीतांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या अंगझडतीत गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस आढळल्याने त्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री 10.50 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रीतेश उर्फ सोनू शांतीलाल निकुंभ (19, नंदा पटेल चौक, खेतिया, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे निरीक्षक नितीन देशमुख, सहा.निरीक्षक दादासाहेब पाटील, नाना आखाडे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, अविनाश कराडे, राहुल गिरी, निलेश पोतदार, तुषार मोरे, दीपक धीवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


