धुळ्यात तीन लाखांच्या गांज्यासह दोघे जाळ्यात
धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : धुळ्यासह गुजरातमधील आरोपींचा समावेश
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारावर गांजा विक्री व खरेदीसाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून दोन लाख 90 हजार रुपये किंमती 29 किलो गांजा व 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली. 31 रोजी दुपारी चार वाजता अभय कॉलेजच्या पाठीमागे ही कारवाई करण्यात आली. भैय्या उर्फ सचिन प्रकाश चौधरी (36, शिव कॉलनी, अभय कॉलेजजवळ, धुळे) व गांजा खरेदीसाठी आलेला अनिल धीरूबाई मणियार (40, शंकर टेकडी, पाण्याच्या टाकीजवळ, ग.नं.2, जामनगर जेलमागे, जामनगर, गुजरात) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक हनुमान उगले, रफीक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, दीपक पाटील, विलास पाटील आदींनी केली.


