चाळीसगावातील जयहिंद टेक्निकल इन्स्टिट्यूटला 25 वर्षे पूर्ण


चाळीसगाव- शहरातील जयहिंद टेक्निकल इन्स्टीट्यूट या संस्थेस 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आय.टी.ई.एस.बोर्ड मुंबई यांच्याकडुन जयहिंद टेक्निकल इन्स्टिट्युटचे संचालक रफिक मणियार व मुंबई बोर्डात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे विनोद बेहारी (दिल्ली), व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदिप देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, विजय शकंर (दिल्ली), एस.सी.व्यास (मुंबई), मुस्तफा पाटणवाला (मुंबई), बी.बी.मणियार (भोकरदन), युसूफ दरवाजावाला (मुंबई) यांच्या हस्ते पावर रेन्युएबल एनर्जी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. रफिक मणियार यांनी आपल्या मनोगतात इन्स्टिट्युटच्या 25 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रदीपप देशमुख, विश्वास चव्हाण, मुस्तफा पाटणवाला, एस.सी.व्यास, जे.एम.खान, रामचंद्र जाधव, संघपाल, नासीरखान, लुकमान शेख यांनीही आपल्या मनोगतात संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन किरण आचार्य तर आभार प्रदर्शन इम्रान खान यांनी मानले. यावेळी नगरसेवक सुरेश चौधरी, अण्णासाहेब कोळी, राजेंद्र चौधरी, शाम देशमुख, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, गफुर पहेलवान, अलाऊद्दीन शेख, फकिरा मिर्झा, प्रेमचंद खिंवसरा, असलम मिर्झा, संजय पाटील, अनिस पिंजारी, आसीफ मिर्झा, अजीज खाटीक, आसीफ खान, हाजी शफी, हाजी इस्माईल, सईद ड्राईव्हर, हाफीज जावेद, तनवीर शेख, एजाज शेख, मुर्तुजा शेख, मोहसीन खान, सुहेलखान, असलमखान तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.