पती-पत्नीच्या भांडणातून पती बेपत्ता


मोबाईल हरविल्याच्या कारणावरून दाम्पत्या झाले होते भांडण

शिरपूर : तालुक्यातील वनावल येथे पत्नीने मोबाईल कुठे हरविला असे विचारल्याच्या रागातून झालेल्या भांडणावरून पती गेल्या 17 दिवसांपासून घरातून घरातून निघून गेला असून अद्याप परत न आल्याने पत्नीने शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. रामचंद्र दत्तू पाटील असे बेपत्ता असलेल्या इसमाचे नाव आहे. तालुक्यातील वनावल येथील भारती रामचंद्र पाटील यांनी पती रामचंद्र दत्तू पाटील यांना 14 जानेवारी रोजी रात्री मोबाईल कुठे हरवला ? असे विचारले असता उभयंतांमध्ये भांडण झाले व 15 जानेवारी रोजी पहाटे कोणाला काही न सांगता पाटील घरातून निघून गेले. त्यांचा सर्वत्र व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र ते न सापडल्याने भारती रामचंद्र पाटील हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने हरवल्याची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !