जळगावात 50 वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू
जळगाव- शहरातील समता नगर येथील रहिवासी मीराबाई अशोक पाटील (50) यांचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.
घरासमोरील एका महिलेच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. मीराबाई यांना घरासमोरील कंपाऊंडच्या लोखंडी गेटमध्ये उतरलेल्या वीज प्रवाहाचा जोरदार धक्का लागला व त्याचा मृत्यू ओढवला. पत्र्याचे घर व पाऊस असल्याने विजेचा प्रवाह लोखंडी गेटमध्ये उतरला असल्याची शक्यता आहे.