दुचाकींचा तिहेरी अपघात : तिघे जखमी


अपघातानंतर धडक देण्यार्‍या दोन्ही मोटारसायकल चालक घटनास्थळावरून पसार

शिरपूर : तालुक्यातील वाघाडी बोराडी रस्त्यावर वाघाडीजवळ उभ्या असलेल्या मोटारसायकलला समोरून व मागून भरधाव वेगाने येणार्‍या दोन मोटारसायकलींनी धडक दिल्याने या अपघातात तीन जण जखमी झाले. हा अपघात रस्त्यावरील पाट चारीवर मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडला. या अपघातात रेहानखान जावेदखान पटवे (10), कयान जाकीर मन्यार (10, वाघाडी) व मोटर सायकल चालक मन्साराम धीरु पावरा (20, रा.वाकपाडा) हे जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी पोहचलेले शिरपूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तत्काळ 108 वर फोन करून अ‍ॅम्बुलन्सद्वारे जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. अपघातानंतर दोन्ही अज्ञात चालक आपल्या दोन्ही मोटरसायकली सहा घटनास्थळावरून पसार झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !