खोट्या बिलाला मंजुरी : शाखा अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंता निलंबीत


शिरपूर : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत भूमिगत गटारीच्या कामात स्वत=ची स्वाक्षरी करून खोटे बील पास करून त्यास मंजूरी देऊन अंतिम मंजुरी साठी बील गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करून वरीष्ठाांची दिशाभूल केल्याप्रकरणी व कामात अनियमितता केल्याप्रकरणी शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबीत करण्यात आले.

निलंबन आदेशाने उडाली खळबळ
शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथे दलीत वस्ती सुधार योजनेच्या भूमिगत पी.यु.सी.भूमिगत गटारीचे काम करण्यात आले आहे. सदर काम उप अभियंता पंचायत समिती शिरपूर यांच्याकडील तांत्रिक दोन लाख 99 हजार रुपये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मंजुरी देण्यात आली होती मात्र सदर झालेल्या कामाचे मोजमाप न घेता मूल्यांकन करण्यात आल्याचे मोजमाप पुस्तकात खोटे व चुकीचे मुल्यांकन नोंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत 13 जानेवारी रोजी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा व गट विकास अधिकारी वाय.डी शिंदे यांनी गिधाडे येथे संयुक्त भेट देत चौकशी केली या चौकशीत सर्व कामाचे मुल्यांकन करत पुर्नमुल्यांकन एकुण 1 लाख 44 हजार 236 होत आहे. म्हणजे 1 लाख 55 हजार 664 रुपयाचे मुल्यांकन काम केलेले नसतांना मोजमाप पुस्तकात नमुद करण्यात आल्याचे दिसुन आले. याबाबत चौकशीअंती गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे यांनी पंचायत समितीचे बांधकाम विभातील शाखा अभियंता आर.आर.पाटील व व्हि.एम.चव्हाण कनिष्ठ अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली होती मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शाखा अभियंता आर.आर.पाटील व कनिष्ठ अभियंता व्ही.एम.चव्हाण यांना निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !