भरधाव मोटारसायकलच्या धडकेत तरुण ठार
शिरपूर : तालुक्यातील चोपडा रस्त्यावर हिसाळे-तोंदे दरम्यान व्यायाम करणार्या तरुणास भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने हिसाळे येथील 20 वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली. अनिल मदन परदेशी (20) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल मदन परदेशी (रा.हिसाळे) हा तरुण चोपडा रस्त्यावर गुरुवारी सकाळी व्यायाम करण्यासाठी गेलेला असतांना दुचाकी (एम.एच.18 वाय.2680) ने जोरदार धडक दिली. यात परदेशी हा गंभीर जखमी झाला. त्याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
व्यायामावरून परतताना गाठले मृत्यूने
अनिल हा व्यायाम करून घरी येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने त्याच्याविरुद्ध जितेंद्र परदेशी यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


