नवापूरात 22 हजार कोंबड्यांचा मृत्यू : नमूने तपासणीसाठी रवाना


नवापूर : शहर व परीसरातील पोल्ट्री फार्ममध्ये 15 दिवसांच्या आत 22 हजारांवर कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून शहरात सर्व चिकन व अंडी विक्री बंद करण्याचे आदेश तालुका प्रशासनाने दिले आहेत. मृत कोंबड्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अधिकार्‍यांनी केली पाहणी
नवापूर शहरातील 26 पोल्ट्रीमध्ये दररोज कोंबड्याच्या मरण्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. त्या अनुषंगाने नवापूर शहरातील डायमंड, परवेज पठाण, व्होरा पोल्ट्री फॉर्ममध्ये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांत अधिकारी वसुमना पंत, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर या अधिकार्‍यांनी पाहणी केली. नवापुर तालुक्यातील 11 पक्ष्यांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

पशू संवर्धन विभागाचे पथक दाखल
नाशिक विभागातील पशुसंवर्धन विभागाचे पथक नवापूर शहरात दाखल झाले आहे. मोठ्या प्रमाणात प्रशासनाची हालचाल सुरू झाल्याने पोल्ट्री व्यावसायीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरीकांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !