जेवणाचा डबा न केल्याने विवाहितेला बेदम मारहाण
शिरपूर : जेवणाचा डबा तयार केला नाही म्हणून शहरातील किस्मतनगरात विवाहितेला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फरीदा जाकिर शेख (20, रा.किस्मतनगर, शिरपूर) या विवाहितेच्या फिर्यादीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास संशयितांनी तिने जेवणाचा डबा तयार केला नाही या कारणासह चरीत्र्याचा संशय घेऊन बेदम मारहाण केली व ठार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी पती जाकिर शेख,सासू लिलकी शेख, सासरा मुनाफ शेख, नणंद नर्गिस शेख, जमील सय्यद, नसीम सय्यद (सर्व रा.किस्मतनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

