तापी पात्रात बुडाल्याने अल्पवयीन बालकाचा मृत्यू


भुसावळ  मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय बालकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता कंडारीजवळील महादेव मंदिरामागे घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रथमेश मनोहर मोरे (12, रा.रेल्वे नार्थ कालनी, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. प्रथमेशसह त्याचे मित्र शनिवारी सायंकाळी कंडारी शिवारातील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पात्रात बुडाल्याने प्रथमेशचा मृत्यू झाला. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात मयताचे मामा यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !