भुसावळात बंद घर फोडून दहा हजारांची रक्कम लांबवली
भुसावळ : शहरातील यशोदा नगरात घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी सात दहा हजारांची रोकड लांबवली. 5 ते 6 फेब्रुवारीच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिभा नंदकिशोर चोरपगार (45, प्लॉट नं.17, यशोदा नगर, भुसावळ) या कामानिमित्त 5 रोजी बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली 10 हजारांची रक्कम लांबवली. तपास तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक संदेश निकम करीत आहेत.


