ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत तरुण ठार
यावल : तालुक्यातील अंजाळे घाटात शनिवारी सायंकाळी ट्रॅक्टर व दुचाकी मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला. भालशिव, ता.यावल येथील प्रदीप चावदस तायडे (29) हे शनिवार, 6 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भुसावळकडुन भालशिव या आपल्या गावी दुचाकी (एम.एच.19 डी.एम.9429) ने जात असतांना भुसावळ रोडवरील अंजाळे घाटात समोरून येणार्या ट्रॅक्टर (एम.एच.19 पी.2953) वरील चालक ज्ञानेश्वर शिवराम कोळी (चोरवड, ता.रावेर) ने धडक दिल्याने प्रदीप तायडे यांचा मृत्यू झाला. याबाबत शांताराम चावदस तायडे (भालशिव) यांनी फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजमल पठाण करीत आहेत.


