भुसावळात अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे वाहनधारकांना मनस्ताप
कंत्राटदाराकडून पाईप लाईन अंथरल्यानंतर व्यवस्थीत दबाई होत नसल्याने संताप
भुसावळ : शहरात गेल्या काही महिन्यांपासून अमृत योजनेचे काम सुरू असून पाईप लाईन अंथरण्यासाठी खोदकाम केल्यानंतर व पाईप लाईन टाकल्यानंतर रोलरच्या सहाय्याने दबाई करणे अपेक्षीत असताना ठेकेदाराकडून मात्र मनमानी सुरू असल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील नसरवांजी फाईल भागात गेल्या चार दिवसांपूर्वीच पाईप लाईन खोदण्यात आली मात्र ठेकेदाराने पाईप टाकल्यानंतर चारी व्यवस्थीत बुजवणे अपेक्षीत असताना दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. पालिका प्रशासनाने गांभीर्याने ही बाब घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


