शेतकर्यानां दिलासा : मुक्ताईनगर तालुक्यातील वीज रोहित्रांचा प्रश्न मार्गी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगरसह बोदवड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज रोहित्र मिळत नसल्याने शेतकर्ययांची गैरसोय होत होती. या संदर्भात शेतकर्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर आमदारांनी वीज कंपनी अधिकार्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी आमदार पाटील यांनी चर्चा केल्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी 5 फेब्रुवारी रोजीच्या पत्रकान्वये सर्वच मागण्यांसंदर्भात मंजुरीसाठी हिरवा कंदील देत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वीज कंपनी अधिकार्यांना देण्यात आले.
शेतकर्यांना मोठा दिलासा
मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील अनेक गावात गेल्या अनेक दिवसांपासून शंभर केव्हीए क्षमतेचे सुमारे 75 रोहित्र, केळी उत्पादक पट्ट्यातील 12 गावातील पाच एममव्हीए क्षमतेचे ट्रान्सफार्मर यासह ए.बी.केबल टाकणे, पथदिवे व पोल उभारणे, अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी करणे, अतिरीक्त भारातील रोहित्र स्थलांतरीत करण्याची समस्या मार्गी लागणार आहे.



