सुकी नदी पात्रातील गौण खनिजाची लूट थांबवावी


लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

रावेर : चिनावल-विवरा रस्त्यावरील सुकी नदीपात्रात वाळू माफियांनी अजिंठा लेण्यांचे स्वरूप आणले आहे. अवैध उत्खनन तत्काळ थांबवावे, अन्यथा लोकसंघर्ष मोर्चा या विरोधात ग्रीन ट्रिबूनलमध्ये जाईल, असा इशारा लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

दोषींवर कारवाईची मागणी
रावेर तालुक्यातील स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष का होत आहे? याची चौकशी करावी शिवाय दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. निवेदनावर प्रतिभा शिंदे, सचिन धांडे , नुरा तडवी, रमेश बारेला आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !