वरणगांव नगरपरीषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार
रमाई जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांची घोषणा
भुसावळ : वरणगाव नगरपरीषद सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून बैठकीचे आयोजन वरणगाव येथे करण्यात आले होते. आगामी वरणगाव नगरपरीषद सार्वत्रिक निवडणूक वंचित सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केली. आगामी काळात येथील निवडणूक होणार असल्याने त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासह रमाई जयंती साजरी करण्यासाठी पक्षातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीस जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, संतोष कोळी, जितेंद्र सुरवाडे, गणेश इंगळे, प्रमोद बावस्कर, बालाजी पठाडे, देवदत्त मकासरे, रवी मोरे, रुपेश कुर्हाडे, राहुल गवई, शांताराम सुरवाडे, संजय सुरवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



