पाय घसरून पाण्यात पडल्याने पळासखेडेच्या शेतकर्याचा मृत्यू
पारोळा : पाय घसरून पाण्यात पडल्याने तालुक्यातील पळासखेडेच्या शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजता घडली. प्रमोद राजाराम निकम (23) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. तालुक्यातील पळासखेडेसीम शिवारातील दत्त सुभाष पाटील यांच्या शेतातील शेततळ्यात पाणी घेण्यासाठी गेला प्रमोद निकम हे गेल असता त्यांचा पाय घसरला व ते पाण्यात बुडून मरण पावले. या प्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल प्रकाश चौधरी करीत आहेत.