जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 47 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 57 हजार 354 वर : एकाच दिवसात 28 रुग्णांची कोरोनावर मात
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 47 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1360 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 354 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 665 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात 28 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 29
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 02
अमळनेर 01
चोपडा 01
पाचोरा 02
भडगाव 01
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 09
मुक्ताईनगर 00
बोदवड 02
अन्य जिल्हा 00


