गुटखा न दिल्याचा राग अनावर : मोठ्या भावालाच केली मारहाण
शिरपूर : गुटखा न दिल्याने लहान भावाकडून मोठ्या भावास शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील आदर्श नगर येथे सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास राहत्या घरी घडली. या प्रकरणी वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पित्याच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध गुन्हा
शहरातील आदर्श नगर येतजील बुधा गिलचंद बिर्हाडे (66) यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा महेश याने लहान भाऊ हितेंद्र यांच्याकडून विमल गुटका पुडी मागितली असता महेश यास विमल गुटका न देता शिवीगाळ करीत हाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने वडिलांनी मुलगा हितेंद्र याच्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.


