सांबरच्या सिंगांची तस्करी : भुसावळचा तरुण जाळ्यात


जळगावात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटजवळ सांबरची शिंगांची तस्करी करणार्‍या भुसावहच्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील मुद्देमालासह कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळचा आरोपी जाळ्यात
भुसावळ येथून जळगावात सांबरची सिंगे विक्रीसाठी कारमध्ये घेवून येत असल्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या दीपक पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये दाखल झाले. मार्केटजवळील हनुमान मंदीराजवळ स्विप्ट कार क्रमांक (एम.एच.19 सी.एफ. 3106) दिसून आली. कारची तपासणी केली असता त्यात सांबर प्राण्याचे दोन शिंगे असल्याचे दिसून आले. शिंगांबाबत कार चालक मोहम्मद तरबेज मोहम्मद गालीब (22, रा.खडका रोड, भुसावळ) यांची विचारणा केली असता काहीही उत्तर दिले नाही. वनविभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून माहिती घेतली असता सांबर या प्राण्याची शिंगे असल्याने संशयित आरोपी मो. तरबेज हा शिंगांची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यांनी कारवाई केली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, सुनील दामोदरे, प्रमोद लाडवंजारी, दीपक पाटील यांनी कारवाई केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !