जळगावात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले


जळगाव- शहरातील महाबळ कॉलनी रोडवरील आयडीबीआय बँकेसमोर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या गळ्यातील 13 ग्रॅमचे मंगळसूत्र धूम स्टाईल चोरीस गेले. सोमवारी सायंकाळी ही घडली. पार्वती नगरातील रजनी अपार्टमेंटमधील रहिवासी वंदना खानवले (57) या सायंकाळी महादेव मंदिरातून दर्शन घेऊन सायंकाळी घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयीतांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने काही कळण्याआत मंगळसूत्र लांबवत पोबारा केला.


कॉपी करू नका.