रावेर तालुका : चार ग्रा.पं.साठी नव्याने निघाली आरक्षण सोडत
रावेर : तालुक्यातील चार ग्रामपंचायतीसाठी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या. सुदगांव येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी तर भोर येथील सरपंचपद नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी), विवरे खुर्द व मस्कावमसीम येथील सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. रेंभोटा येथील सपना आनंदा सपकाळे यांनी आरक्षण काढण्याला आक्षेप घेतल्याने त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईसाठी रवाना करण्यात आलं आहे.

